RSS प्रमुख भागवत विरोधात सहभागी न झालेल्या 60 युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांची झाली हकालपट्टी
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
VANSH NEWS DIGITAL WEB PORTAL ONLINE
नागपूर : 21 जानेवारी 2025
युवक काँग्रेसच्या बैठकीनंतर संघ मुख्यालयाला घेराव आंदोलनावरून युवक काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची स्थिती आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच राम मंदिर स्थापनेनंतर देशात स्वातंत्र्य अनुभवास आले, असे वक्तव्य केले. हे वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आदेशावरून नागपुरात संघ मुख्यालय परिसरात निदर्शने करण्याच्या युवक काँग्रेसच्या या महत्वाच्या आंदोलनामध्ये दांडी मारल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीने पदमुक्त करण्यात आले आहे.
काँग्रेसने काढून टाकलेल्यांमध्ये काही उपाध्यक्ष, 8 सरचिटणीस, 20 सचिव आणि काही जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी अजय छिकारा आणि सहप्रभारी कुमार रोहित यांनी यासंदर्भातील पत्र काढले आहे. त्यानुसार यासंदर्भातील संघटनेने दिलेले काम जबाबदारीपूर्वक करण्यात अपयशी ठरल्याने पदमुक्त करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय युवा काँग्रेसने 19 जानेवारी रोजी राष्ट्रीय प्रमुख उदय भानू यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढला होता
.
पदमुक्त करण्यात आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचे चिरंजीव केतन ठाकरे, माजी विरोधी पक्षनेते व आमदार विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार,युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, केतन ठाकरे, अनुराग भोयर, मिथिलेश कन्हेरे, अक्षय हेटे, माजी आमदार अशोक धवड यांचे चिरंजीव अभिषेक धवड यांचा समावेश आहे.
कारवाई झालेले पदाधिकारी दिल्लीत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब व राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावेरु यांच्याकडे मांडणार आहेत.
परंतु हकालपट्टी करण्यात आलेल्या युथ कांग्रेसच्या पदाधिकारी यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांचेविरोधात च उघड भुमिका घेतल्याचे दिसत आहे. या पदाधिकाऱ्यांवर कारवाई दिल्लीतुन करण्यात आली. पण ज्यांच्यावर कारवाई झाली ते कुणाल राऊत यांनाच हटविण्याच्या भुमिकेत दिसत आहे.
महाराष्ट्र युवक कांग्रेसमधील या घमासाणाकडे आता दिग्गज कांग्रेस नेत्यांचे ही लक्ष लागले आहे.