रनाळा ग्रा.पं.सरपंच पंकज साबळेंना भारताच्या प्रजासताक दिन 26 जानेवारी 2025 करिता राजपथ नवी दिल्ली येथे विशेष अतिथी म्हणून निमंत्रण
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
रनाळा/कामठी/नागपुर : 18 जानेवारी 2025
भारत देशाच्या प्रजासताक दिन 26 जानेवारी 2025 च्या परेडमधे उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्र राज्यातून राज्य सरकार द्वारे विशेष अतिथी म्हणून कामठी तालुक्यातील रनाला ग्रामपंचायत चे सरपंच पंकज विमल नागोराव साबळे यांना सहपरिवार नामनिर्देशित केल्या बद्दल सरपंच पंकज साबळे यांनी महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे, तसेचजिल्हा परिषद नागपूर,पंचायत समिती कामठी यांचे मनापासून आभार मानले.
महाराष्ट्र राज्यातून विविध क्षेत्रातून उल्लेखनीय उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींची विशेष अतिथी म्हणून निवड करण्यात आली. त्यामधे सरपंच वर्गातून महाराष्ट्र राज्य नागपूर जिल्हा परिषद ,कामठी पंचायत समिती, ग्रामपंच्यात रनाळा,येथील सरपंच पंकज विमल नागोराव साबळे व पत्नी स्वाती पंकज साबळे यांची सहपरिवार भारताच्या प्रजासताक दिन 26 जानेवारी 2025 राजपथ न्यू दिल्ली येथे (विशेष अतिथी) महनून निवड करण्यात आली असल्याचे पत्र नागपूर जिल्हा परिषद चे मुख्य अधिकारी विनायक महामुनी यांनी दिले आहे. रनाळा ग्रामपंचायत चे सरपंच पंकज साबळे यांनी
केंद्र सरकारच्या घर घर जल,प्रधान मंत्री आवास योजना, मिशन इंद्रधनुष,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,मातृ वंदना योजना, उजवला योजना, विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री पोषण योजना यांचे 100 % यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. त्या सोबत नागपूर जिल्यातून सर्वात जास्त विकास निधी प्राप्त करण्यारे सरपंच म्हणून पंकज साबळे याची ओळख आहे.
राज्य सरकार चे सर्व विकास प्राधिकरण,व विविध योजनेतून त्यांनी गावासाठी मोठया प्रमाणात निधी मिळविला आहे सरपंच पंकज साबळे यांची भारताच्या प्रजासत्ताक दिन 2025 च्या परेड सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी निवड विशेष अतिथी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांनी रनाळा ग्रामपंचायत सर्व ग्रा.प.सदस्य, कर्मचारी व सर्व रनाळा गावातील नागरिकाचे मनापासून आभार मानले आहे.
गावातील नागरिकांनी मला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्यामुळे हे सर्व काही शक्य झाले असून ” लोकनेते चंद्रशेखर बावणकुळे हे माझे आदर्श असून त्यांच्या विकास विजन मुळे सर्व विकास कामे शक्य झाले असल्याचे ” सरपंच पंकज साबळे यांनी सांगितले आहे.