गुमथळा सर्कल; करोडो रुपयांचे विकासकार्य,3 वर्षाची जि. प. सदस्य दिनेश ढोलेंची अविस्मरणीय कारकिर्द
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
कामठी/नागपुर : 19 जानेवारी 2025
नागपुर जिल्ह्य़ातील तालुक्यातील गुमथळा सर्कल च्या जिल्हा परिषद ची सन 2021 ची पोटनिवडणुक भाजप साठी अत्यंत वेदनादायक ठरली. नागपूर जिल्हा परिषदेचे भाजप चे विरोधी पक्षनेते अनिल निधान यांना भाजप ने तिकिट नाकारली. नंतर इच्छा नसतांना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे आग्रहाखातर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अनिल निधान यांचा कांग्रेसचे युवा तडफदार दिनेश ढोले यांनी दारुण पराभव केला. कांग्रेस नेता सुरेश भोयर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे दिनेश ढोलें यांनी गुमथळा सर्कल मधुन विजय मिळविल्याने भाजप ची या भागात मोठी नाचक्की झाली होती.
ओबीसी आरक्षणाचा कोटा हा 50% पेक्षा जास्त झाल्याने याआधी नागपूर जिल्हा परिषद च्या 16 सदस्यांचे सदस्यत्व रद झाले होते. गुमथला जिप सर्कल चे भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान यांची सदस्यता रद्द झाली होती. 5 अक्टोबर 2021 झालेल्या पोटनिवडणुकीत गुमथळा जिप सर्कल मधुन दिनेश ढोले यांना 10474 तर अनिल निधान यांना 6879 मते मिळाली. दिनेश ढोले यांनी 3595 मतांनी विजय मिळविला.
फक्त 3 वर्षाचा छोटा कार्यकाळ दिनेश ढोलें यांच्यासाठी कमी जरी असला तरी त्यांनी गुमथळा महालगाव सर्कलमध्ये प्रलंबित विविध सिमेंट रस्ते,आजनी-लिहिगाव-गादा-कढोली पांदन रस्ता, एकर्डी-उमरी पुल बांधकाम , जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे आवंढी येथील काम,धान, कापुस सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळवुन देणे, हल्दीराम कंपनीतील दुर्घटनेतील पिडित कुटुंबांना आर्थिक मोबदला व एका व्यक्तीस नोकरी, परिसरातील कारखान्यात युवक, महिलांना रोजगार उपलब्धी, गुमथळा सर्कलमधील शेतकऱ्यांच्या क्रृषीपंपाला 24 तास वीज पुरवठा, कापसी (खुर्द) मधील पांदन रस्त्यावरील झोपडे हटविण्यावर स्थगिती, दारुचे नव्याने दुकान लावण्यासाठी आंदोलन, याशिवाय या सर्कलमधील वारकरी संप्रदयवाढीसाठी सुप्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज यांचे किर्तनाचे कार्यक्रम ई. महत्वपूर्ण घटना नक्कीच येथील ग्रामस्थांना कायमस्वरूपी लक्षात राहणाऱ्या आहेत.
फक्त 3 वर्षाचा अल्पावधी मिळुनही जि. प. सदस्य दिनेश ढोलें त्यांनी सर्वसामान्य मतदारांच्या चेहऱ्यावर हास्य व समाधान फुलवण्याचा कार्य केले अजुनही भरपुर कामे करण्याचे व शासनाकडून करोडो रुपयांचा निधी आणुन गुमथळा सर्कलचा चेहरामोहरा बदलविण्याची त्यांची इच्छा होती. नागपुर जिल्हा परिषदेत विविध प्रश्न उचलुन प्रशासनाला धारेवर धरण्याची कसब दिनेश ढोलें यांच्यात आहे.कुठलेही सभापती पद जरी नसले तरी कामासाठी विकासनिधी खेचून आणणे विकासकामाला पुर्णत्वास नेणे त्यासाठी हाताशी युवक, महिला, अनुभवी वरिष्ठ राजकारण्यांचे मार्गदर्शन या जोरावर दिनेश ढोलें यांनी गुमथळा सर्कलच्या विकासाला गती दिली.
परंतु नागपुर जिल्हा परिषदेला मुदतवाढ मिळाली नाही. लवकरच नागपुर जिल्हा परिषदेची निवडणूक होणार असुन येत्या निवडणुकीत परत एकदा जनतेचा आशिर्वाद त्यांना असाच मिळेल असा आशावाद गुमथळा सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोलें यांनी व्यक्त केला आहे.